शिवराजेश्वर मंदिरा’ ला वार्षिक १ लाख,तर औरंगजेबाच्या कबरीला अडीज लाख

शिवप्रेमी संतप्त;औरंगजेबाच्या कबरीचा निधी बंद करा

कुडाळ प्रतिनिधी

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक ‘श्री शिवराजेश्वर मंदिरा’साठी तब्बल ५५ वर्षांनंतर वाढवलेला १ लाख रुपयांचा वार्षिक निधी हा अत्यंत तुटपुंजा असून, तो क्रूर आक्रमक औरंगजेबाच्या कबरीला मिळणाऱ्या निधीपेक्षाही निम्म्याने कमी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या मंदिराला वर्षाला १ लाख आणि क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी तब्बल अडीच लाख रुपये दिले जाणे, हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. सरकारने औरंगजेबाच्या कबरीचा निधी तातडीने बंद करावा आणि श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी विशेष बाब म्हणून वार्षिक १२ लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी आग्रही मागणी हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक तथा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक श्री. संजय जोशी यांनी कुडाळ येथील हॉटेल स्पाइस कोकण येथील पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊळ, शिवप्रेमी संघटनेचे रमाकांत नाईक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page