कुडाळ प्रतिनिधी
पंचायत समिती कुडाळ च्या मासिक सभेत पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी माणगाव मधील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्या बाबत पंचायत समितीच्या मासिक सभेत प्रश्न उपस्थित केला होता
माणगाव खोऱ्यातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत बोलताना पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी एकच फिडर असल्याने कुठेही दुरुस्तीचे काम असले तर माणगाव चा वीजपुरवठा खंडित करावा लागतो
कुडाळ वेंगुर्ला सावंतवाडी ओरोस येथे दुरुस्तीचे काम असले तर माणगाव बंद करावा लागत असे, आता सगळे वेगवेगळे फिडर केल्यामुळे बाकी ठिकाणी दुरुस्तीचे काम असले तर माणगाव बंद होणार नाही.
अशी माहिती MSEB चे श्री शेळके यांनी दिली
त्यामुळे माणगाव खोऱ्यातील हा प्रश्न सोडवल्याबद्दल ग्रामस्थांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे आणि योगेश धुरी यांचे आभार मानले.
माणगाव पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांच्या पाठपुराव्याला यश
