सावंतवाडी प्रतिनिधी
शिक्षणाला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या तर्फे आजगांव पंचक्रोशीत शालेय साहित्य वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात आजगांव जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून करण्यात आली.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या शिक्षणाला बळ मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून संपूर्ण मतदारसंघात टप्प्याटप्प्याने शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, कोणतीही निवडणूक समोर नसताना केवळ सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विशालजी परब सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या शैक्षणिक उपक्रमाचे आजगांव पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक व शिक्षकांकडून स्वागत करण्यात येत असून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी भाजपा युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, भाजपा सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, आजगांवचे माजी सरपंच अण्णा झाट्ये, ओंकार आजगांवकर, अमित आजगांवकर, गिरीश परब, निल झाट्ये,गोविंद वैज, दीपक हळदणकर,अभिषेक फेद्रे,ॐ आजगावकर मुख्याध्यापिका सौ. म्हाडगुत, शाळेतील शिक्षकवर्ग, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
