ठळक घडामोडी

कोलझर वृक्षतोड प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल

सावंतवाडी प्रतिनिधी कोलझर येथे खाजगी जंगलक्षेत्रात झालेल्या वृक्षतोडप्रकरणी वनविभागाने ठोस पावले उचलली आहेत. या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्याबरोबरच येथे झालेल्या वृक्षतोडीचा रितसर पंचनामा करण्यात आला. कोलझर येथील डोंगरात काही अज्ञातांनी सुमारे ४ किलोमीटर लांबीचे उत्खनन केले होते. हा परिसर केंद्र सरकारने इकोसेन्सिटीव्ह एरिया म्हणून जाहीर केला आहे. स्थानिकांच्या मालकी क्षेत्रात विनापरवाना घुसून हे उत्खनन…

Read More

कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी सुशांत नाईक विजयी

भाजपचे उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार राकेश राणे यांचा पराभव माजी आमदार वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा कणकवली प्रतिनिधी कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदाच्या निवडण्यासाठी विशेष सभा आज नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी शहर विकास आघाडीच्या वतीने सुशांत नाईक तर भाजपच्या वतीने राकेश राणे असे दोन अर्ज दाखल झाले होते. त्यानुसार झालेल्या निवडणुकीत…

Read More

अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ मांसाहेब जयंती साजरी

सावंतवाडी प्रतिनिधी पुण्यस्मरण राजमाता जिजाऊ मांसाहेब यांची जयंती दरवर्षी १२ जानेवारी रोजी साजरी केली जाते. यंदाही मोठ्या उत्साहात अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती पर्णकुटी विश्रामगृह सावंतवाडी येथे संपन्न झाली. तसेच यानिमित्ताने यंदाच्या मराठा महासंघ सावंतवाडी मार्फत दरवर्षी होणाऱ्या भव्य दिव्य ‘शिवजयंती महोत्सव २०२६’ कार्यक्रमाची नियोजन बैठक देखील पार पडली. यावेळी मराठा…

Read More

माडखोल येथे भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य वास्तूचे उद्घाटन

सावंतवाडी प्रतिनिधी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची प्रेरणा आणि सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माडखोल येथे नूतन बांधण्यात आलेल्या शिव छत्रपती सैनिक भवनचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. भाजपचे धडधडीच युवा नेते विशालजी परब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांसाठी हक्काचे व्यासपीठ…

Read More

लाड पागे समितीच्या शिफारशिंनुसार जिल्हापरिषदेकडील सफाई कर्मचाऱ्यांच्या 13 वारसांना वारसा हक्काने दिल्या नियुक्त्या

मात्र प्रस्ताव केलेल्या उर्वरित 12 उमेदवारांना नियुक्त्या न दिल्याने संशयास वाव.? सफाई कर्मचारी वारसांसाठी विभागीय आयुक्त कार्याल्यासमोर प्रजासत्ताक दिनी उपोषण आंदोलन करण्याच्या तयारीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्क लाभ म्हणून जिल्हापरिषद प्रशासनाकडून नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचे हस्ते शनिवारी जिल्ह्यातील 13 वारसांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषद…

Read More

राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या,सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी

१५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. मुंबई प्रतिनिधी महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी होणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र, निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निवडणुकांसाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी केली होती. अखेर, राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला असून जिल्हा…

Read More

सैनिक स्कूल आंबोलीच्या ‘वीर जवान दौड’ला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

४०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग.! सावंतवाडी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली यांच्या वतीने आयोजित ‘वीर जवान दौड’ या मॅरेथॉन स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला असून या स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा विविध जिल्ह्यांतून ४०० हून अधिक स्पर्धक सहभागी याले होते भारतीय सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांना समर्पित करण्यात आलेली ही स्पर्धा…

Read More

शहिदी समागमाच्या ३५० व्या वर्षानिमित्त – नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी होणार भव्य कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी शिख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारी रोजी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव व उदासीन असे नऊ समाज-संप्रदाय नांदेड या ठिकाणी एकत्र येणार आहेत.श्री गुरु…

Read More

माडखोल येथे ‘सैनिक भवना’चे उद्या भव्य उद्घाटन

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते उद्या होणार लोकार्पण. सावंतवाडी प्रतिनिधी माडखोल येथील माजी सैनिकांच्या व ग्रामस्थांच्या बहुप्रतिक्षित अशा ‘सैनिक भवना’चा लोकार्पण सोहळा उद्या आयोजित करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न होणार आहे. माजी सैनिकांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी या…

Read More

मंत्री नितेश राणे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर संशयास्पद बॅग आढळून आल्याने एकच खळबळ

मुंबई पोलिस घटनास्थळी दाखल, वेगाने तपास सुरू मुंबई (प्रतिनिधी) राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर अज्ञाताने एक संशयास्पद बॅग ठेवल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईतील सुवर्णगड बंगल्याबाहेर अज्ञात व्यक्तीने बॅग ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. माहिती मिळताच मुंबई पोलीस…

Read More

You cannot copy content of this page