आंबेडकरनगर,दत्तनगर व कविलकट्टा रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक; नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंता श्री. पिसाळ याना निवेदन
सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) निवेदनाद्वारे ‘रस्ता रोको’चा इशारा! कुडाळ:कुडाळ-बाव या मुख्य जिल्हा मार्ग क्रमांक २७ (MDR 27) वरील विशेषतः आंबेडकर नगर आणि कविलकट्टा तसेच दत्तनगर रोड परिसरातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, येथे पडलेल्या भव्य खड्ड्यांमुळे प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. तसेच गणेश चतुर्थी हा सण देखील काही दिवसांवर आहे त्यामुळे रेल्वेने येणाऱ्या लोकांची देखील…
