केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांनी डोंगरपाल-डिंगणे येथील स्वामी समर्थ सेवा मठात घेतले दर्शन

बांदा :-
केंद्रीय ऊर्जा मंत्री मा. श्रीपादजी नाईक यांनी आज डोंगरपाल-डिंगणे येथील सदगुरू श्री नवनीतानंद महाराज स्थापित सदगुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठास सदिच्छा भेट देत श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी श्रीपादजी नाईक यांनी मठातील धार्मिक व आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेत श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. मठाच्या माध्यमातून सुरू असलेल्या धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांचीही यावेळी माहिती घेण्यात आली.
श्रीपादजी नाईक यांच्या आगमनावेळी मठ परिसरात भक्तगण व स्थानिक नागरिक उपस्थित होते. उपस्थित भक्तांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मठात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या यावेळी गणपत गवस, परिमल सावंत, बाबाजी गवस, भिकाजी तिरोडकर, सागर सावंत, शशी राणे, जयेश सावंत, संजय नाईक यांच्यासह भक्तगण उपस्थित होते.
सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनानंतर श्रीपादजी नाईक यांनी उपस्थित भक्तांशी संवाद साधला. या भेटीमुळे मठातील भक्तगणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page