शिक्षण मंत्रांच्या जिल्हात शिक्षणाचे तीन तेरा वाजले,अचानक शालेय परीक्षा रद्द,मुलांना झालेल्या त्रासाला जबाबदार कोण.?

शिक्षण मंत्रांच्या जिल्हात शिक्षणाचे तीन तेरा वाजले,अचानक शालेय परीक्षा रद्द,मुलांना झालेल्या त्रासाला जबाबदार कोण.?*

मोदींच्या कार्यकाळात शिक्षणाला नाही तर, निवडणुकीला जास्त महत्व आहे*

संबंधितांवर कारवाई करा,युवासेनेची मागणी-योगेश धुरी,युवासेना तालुकाप्रमुख*

*🎤सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)*
⭕शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात अचानक शालेय परीक्षा रद्द झाल्याने मुलांची तारांबळ उडाली.
⭕शिक्षणमंत्री यांच्या जिल्ह्यातच ही परिस्थिती मग संपूर्ण महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल?
⭕भाजप सरकार मोठे मोठे दावे करत आहे परंतु ग्रामीण भागात ही परिस्थिती आहे, मोदींच्या कार्यकाळात शिक्षणाला नाही तर निवडणुकीला जास्त महत्व आहे
⭕राणे,सामंत,केसरकर सातत्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, यांच्यावर टीका करतात परंतु आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतून मुंबई महानगर पालिकेच्या शाळा प्रवेश हाऊस फुल्ल आहेत. एवढं चांगला शिक्षणाचा दर्जा निर्माण केला
⭕दुसरीकडे केसरकरांच्या हातात शिक्षण खाते आल्यावर शिक्षणाचे तीन तेरा वाजवले
⭕जिल्ह्यातील बेरोजगारांवर अन्याय, चुकीच्या पद्धतीने संच मान्यता, आणि आतां परीक्षाच रद्द
⭕सत्तेत असून ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष देता येत नाही आणि महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या म्हणे
⭕परीक्षा रद्द केल्या कारण निवडणुकी चे ट्रेनिंग पण, शनिवारी परीक्षा घेऊन रविवारी निवडणुकिचे ट्रेनिंग लावता आले असते परंतु
अश्याप्रकारे मुलांचे मानसिक खच्चीकरण केले गेले
⭕यासंदर्भात युवासेना मुख्यकार्यधिकारी, शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई ची मागणी करणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page