२५ सप्टेंबरपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात विक्रमी सदस्यता नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे:भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर यांचे आवाहन
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
दिनांक २ सप्टेंबरपासून देशभरात सर्वत्र भाजपा सदस्यत्व मोहीम सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या अभियानाचे नेतृत्व करत आहेत. भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या यापूर्वीच्या सदस्यत्वाचे २ सप्टेंबरनंतर पुन्हा नुतनीकरण करायचे आहे.
भाजपाच्या वतीने “सदस्यता अभियान” दर पाच वर्षांनी राबवले जाते आणि भाजपाच्या घटनेनुसार सर्व विद्यमान सदस्यांनाही आपल्या सदस्यत्वाचे नूतनीकरण करावे लागते. भाजपाचे काम करू इच्छिणाऱ्या अन्य व्यक्तीही या अभियानाच्या दरम्यान पार्टीचे सदस्य होऊ शकतात.
ही सदस्यत्व मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिला टप्पा २ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत पूर्ण करण्यात येईल , तर दुसरा टप्पा त्यानंतर एका आठवड्याने सुरू होईल आणि १५ ऑक्टोबर रोजी संपेल.
सन २०१४ मध्ये चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला मागे टाकून भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला होता. २०१९ मध्ये कोरोनामुळे या अभियानावर बंधने आली होती, मात्र यावर्षी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याकडे वाटचाल करत आहे. भाजपाचे प्राथमिक सदस्य होण्यासाठी https://narendramodi.in/bjpsadasyata2024/0TSPCT ही लिंक वापरून किंवा 88 00 00 2024 या क्रमांकावर मिस कॉल देऊन ऑनलाईन सदस्य होता येईल, भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचे पुन्हा एकदा नूतनीकरण करून घ्यावे, तसेच नवीन व्यक्तींना पार्टीचे सदस्य करून घ्यावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते श्री अविनाश पराडकर यांनी केले आहे.
