निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश…
कुडाळ (प्रतिनिधी)
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कणकवली येथे जाहीर सभा होत असतानाच भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांना भारतीय जनता पार्टीने धक्का तंत्र वापरत वारंगाची तुळसूली गावचे सरपंच माजी पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, उपसरपंच जयराम वारंग यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश भारतीय जनता पार्टी कुडाळ येथील कार्यालयात घेण्यात
आला.
यावेळी वारंगाची तुळसूली ग्रामपंचायत सदस्य विलास वारंग, लक्ष्मण राव, राजश्री जाधव, साक्षी वेंगुर्लेकर, अंकिता मेस्त्री, प्रतिभा वारंग, अश्विनी वारंग सुचित वेंगुर्लेकर या ग्रामपंचायत सदस्याने भारतीय जनता पक्षात कुडाळ कार्यालय येथे जाहीर प्रवेश केला आहे.
सद्यस्थितीत भारतासह महाराष्ट्रात नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेल्या विकासात्मक बदलाला पाहता वारंगाच्या तुळसुली गावात होऊ घातलेल्या विकासात्मक कामांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी आम्ही सर्वच सरपंच उपसरपंच सापयत सदस्य भारतीय जनता पार्टी
ज्ञीत जाहार प्रवश करत आहोत. यावेळी या
पक्षप्रवेशात दीडशेहून अधिक कार्यकर्त्यांची
उपस्थिती लक्षणीय होती. तर हा कुडाळ तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत सर्वात मोठा पक्षप्रवेश असल्याची चर्चा कुडाळ तालुक्यात रंगत होती.
