सागर कारिवडेकरच्या सावंतवाडीतील आलिशान बंगल्याचा आज पंचनामा,ठाणे क्राईम ब्रँचचे विशेष पथक आज सकाळी सावंतवाडीत दाखल.
सावंतवाडी प्रतिनिधी
शेअर ट्रेडिंग मार्केट घोटाळ्याच्या प्रकरणाने अखेर मोठे वळण घेतले असून करोडपती सागर कारिवडेकरच्या सावंतवाडीतील आलिशान बंगल्याचा आज पंचनामा करण्यासाठी ठाणे क्राईम ब्रँचचे विशेष पथक आज सकाळी सावंतवाडीत दाखल झाले असून या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
गुंतवणूकदारांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. ठाण्यातील सचिन राणे, प्रिती राणे आणि सावंतवाडीतील सागर कारिवडेकर यांच्यातील कथित ‘ठाणे ते सावंतवाडी’ कनेक्शन उघड झाल्याने तपासाला गती मिळाली आहे. या तिघांना घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार मानले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
