मालवणचो कट्टो प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्र दिन, कामगार दिन व सिंधुदुर्ग स्थापना दिनाच्या निमित्याने रक्तदान शिबिर संपन्न

थॅलेसेमिया निर्मूलनासाठी सिंधुदुर्ग रेड बटालियन,वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन,ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने भरवले शिबिर मालवण प्रतिनिधी थॅलेसेमिया निर्मूलनासाठी मालवणचो कट्टो प्रतिष्ठान(रजि.) मुंबई, सिंधुदुर्ग रेड बटालियन, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन, ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने समर्पण रक्तपेढी घाटकोपर (ईस्ट) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. असह्य उन्हाळा असूनही थॅलेसेमिया रुग्णाच्या रक्तदानाच्या गरजा पुरवण्यासाठी…

Read More

११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राजकोट येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेणार दर्शन कणकवली – करंजे येथील गोवर्धन गो शाळेचे करणार उद्घटन सिंधुदुर्ग प्रतिनिधी मालवण शहरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार दिनांक ११ मे रोजी दुपारी १२.३० ते १.३० या दरम्यान दर्शन घेणार आहे. यावेळी मंत्रिमंडळातील इतर मंत्री देखील…

Read More

वीस वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग, मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यावर चार वेळा आमदार असणारे माजी पालकमंत्री दीपक केसरकर गप्प का.

सिंधुदुर्ग मधील स्थानिक जनतेला नको असलेले प्रकल्प लादण्यापेक्षा आपण घोषणा केलेले चष्म्याचा कारखाना व सेटॉपबॉक्स निर्मिती कंपनीचे काय झाले ते जाहीर करावे. गेल्या 30 वर्षातल्या राज्यकर्त्यां कडून आलेल्या वाईट अनुभवांमुळे शक्तीपीठ महामार्गास जनतेचा विरोध: मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्ह्याच्या जनतेने कुडाळ येथे एमआयडीसीसाठी, चिपी येथे विमानतळासाठी, माणगाव येथे धरण प्रकल्पासाठी अत्यल्प मोबदल्याच्या बदल्यात…

Read More

वैभववाडीत पोलीस कर्मचाऱ्यांची आत्महत्यावैभववाडीत पोलीस कर्मचाऱ्यांची आत्महत्या

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या तरुण पोलीस कर्मचाऱ्यांने आत्महत्या केली आहे. आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनाचा केला शेवट या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कुडाळातील पोलीस कर्मचाऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच वैभववाडी मध्ये पोलीस कर्मचाऱ्याची दुसरी घटना घडली आहे त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली…

Read More

नेत्रदत्त सृष्टीदर्शन” म्हणजे पर्यावरणास जिवंतपणा देणारी अनुभूती ‘

‘नेत्रदत्त’ चे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते शानदार उद्घाटन सावंतवाडी प्रतिनिधी ‘नेत्रदत्त’ सृष्टीदर्शन हे प्रदर्शन म्हणजे पर्यावरणाला पूरक व सुरेख संदेश देणारी अनुभूती आहे. डॉ. नेत्रा सावंत तसेच ज्येष्ठ चित्रकार श्री हरेकृष्ण भगवान व विश्राम भगवान यांनी अतिशय सुबकरित्या केलेली पेंटिंग मनाला वेधून घेणारी आहेत. येथील चित्रे पर्यावरण संरक्षण आणि आपल्या जीवनात आध्यात्मिकता आणण्याचे महान…

Read More

दोडामार्ग वनविभाग ‘पुष्पा’ जन्माला घालतोय

खैर वृक्षाची मोठ्या प्रमाणात तस्करी, वनविभाग अजूनही गांधीगिरीच्या भूमिकेत का?? हिंदुत्ववादी युवकांची भूमिका मोलाची ठरली दोडामार्ग प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यातील हिंदुत्ववादी युवकांना गाडीत कत्तली साठी गुरे नेत आहेत असा संशय असल्यामुळे त्या गाडीचा पाठलाग केला, मात्र यातून एक वेगळे आणि धक्कादायक सत्य उजेडात आले. दोडामार्ग तालुक्यासह गोवा वनविभागाला हादरवून सोडणारा “पुष्पा” यानिमित्ताने वनविभागाच्या ताब्यात आला. यात…

Read More

मालवण येथे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाईसाहेब गोवेकर यांचा ७५ वा वाढदिवस उत्साहात साजरा

गुरुनाथ खोत, वैभव नाईक,परशुराम उपरकर,संदेश पारकर,सतीश सावंत यांची प्रमुख उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख, जेष्ठ निष्ठावंत शिवसैनिक भाईसाहेब गोवेकर यांचा ७५ वा वाढदिवस मालवण शिवसेना शाखा येथे गुरुवारी केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते गुरुनाथ खोत, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा…

Read More

निधी देण्यासाठी आम्ही जबाबदार आहोत शेतकरी जगला पाहिजे: आम.निलेश राणे

कुडाळ येथे संपन्न झाली खरीप हंगाम तालुकास्तरीय पूर्व तयारी नियोजन बैठक कुडाळ प्रतिनिधी मी स्वतः शेतात उतरलो नसलो तरी शेतीचे अर्थकारण कसे सुधरावे यामध्ये मला रस आहे असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी करून कृषी विभागाच्या प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्यांना काय पाहिजे ते विचारलं पाहिजे आमचा शेतकरी तुमच्याजवळ येणार नाही पण तुम्ही…

Read More

वालावल हुमरमळा येथे २६ रोजी ‘स्वामी अन्नपूर्णा’ नाट्यप्रयोग..

कुडाळ प्रतिनिधी श्री अतुल बंगे मित्रमंडळ व हुमरमळा वालावल ग्रामस्थ यांच्या वतीने शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:30 वाजता ट्रीकसीनवर स्वामी अन्नपूर्णा हे नाटक श्री रामेश्वर मंदिर हुमरमळा येथे सादर होणार आहे. या नाट्य प्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. श्री स्वामी जयंतीचे औचित्य साधुन शनिवार दिनांक 26 रोजी श्री देव रामेश्वर…

Read More

कुडाळ पोस्ट ऑफिस जवळ डंपरची धडक एका पादचारीला बसल्याने पादचारी गंभीर जखमी कुडाळ पोस्ट ऑफिस जवळ डंपरची धडक एका पादचारीला बसल्याने पादचारी गंभीर जखमी

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ पोस्ट ऑफिस जवळ डंपरची धडक एका पादचारी ला बसल्याने पादचारी गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. सुभाष बाबू कुबल (वय ६७, रा. दाभोली-तेलीवाडी ता. वेंगुर्ला) असे त्यांचे नाव आहे. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबूळी येथे हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पोस्ट ऑफीस चौकात…

Read More

You cannot copy content of this page