जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. चे महत्वाचे पाऊल
सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. तर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तकेंद्र व रक्तविघटन केंद्र, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्मार्ट सर्व्हिसेसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी सिद्ध केली. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे…
