माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या पुढाकारातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

सावंतवाडी प्रतिनिधी
शहरासह मतदारसंघातून नारायण राणे यांच्या मागे मोठं मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला. दरम्यान शहारत प्रभाग क्रमांक पाचमध्ये माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या पुढाकारातून महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्राचाराचा शुभारंभ करण्यात आला.

या ठिकाणी मंत्री दीपक केसरकर व शिवसैनिक, मनसैनिक, राष्ट्रवादी व रिपाई आदी मित्रपक्ष मिळून ही जागा विजयी करू अस तेली म्हणाले. याप्रसंगी माजी आमदार राजन तेली, युवा नेते विशाल परब, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, बाबु कुडतरकर, देव्या सुर्याजी, अजय गोंदावळे, संतोष गांवस, बंटी पुरोहित, मोहीनी मडगावकर, किशोर चिटणीस, परिक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे, केतन आजगावकर, सत्यवान बांदेकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page