निळेली येथील दोन‌ दीवस बीएसएनएल टॉवर बंद असल्याने नेटवर्क चा प्रॉब्लेम..

वाडोस,निळेली,मोरे येथील ग्रामस्थ आक्रमक,अधिकाऱ्यांना धरले धारेवर

कुडाळ तालुक्यातील
निळेली येथील गेले दोन दिवस BSNL टॉवर नादुरुस्त असल्याने वाडोस निळेली मोरे या गावामध्ये नेटवर्क चा खेळ खंडोबा पाहायला मिळत आहे.ग्रामस्थांनी आक्रमक होत अधिकाऱ्यांना धरले धारेवर जोपर्यंत टाॅवर चालू होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांकडून पाहायला मिळत होता.
यावेळी योगेश उर्फ भाई बेळेकर, आर .के सावंत,संतोष सावंत,सागर जाधव, देवेंद्र भितये,सूर्या धुरी,दिनेश शिंदे,उमेश म्हाडगुत, राजेश डीगे, बाबा निकम व,भाई पालकर, दिनेश सुभेदार,श्री. रेगडे, प्रवीण सावंत मनीष वाळके ,अमोल कदम, संकेत सावंत ,समीर सावंत ,गंगाधर धुमक इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते

ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून जोपर्यंत टॉवर सुरळीत चालू होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना जाऊ देणार नाही अधिकाऱ्याने लेखी स्वरूपात टॉवर संदर्भात तसेच नेट संदर्भात बी एस एन एल कंपनी कडून आपल्याला कुठल्याही प्रकारची यंत्रणा तसेच बंद पडलेल्या वस्तू नवीन मिळत नाहीत तसेच लाईट गेल्यावर टाॅवर चालू राहण्यासाठी बॅटरी उपलब्ध नाही वरिष्ठांना वारंवार कळून आम्हाला यंत्रसामुग्री मिळत नाही असे लिहून घेण्यात आले.
तब्बल तीन ते चार तासानंतर ग्रामस्थ टॉवर जवळ बसून राहिले रेंज सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही.असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला वरिष्ठांच्या लेखी आश्वासनाअंती ग्रामस्थांचा आक्रमक पवित्र मागे घेण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page