माणगावत Bsnl नेटवर्कचा खेळ खंडोबा..

पंचायत समिती सदस्य योगेश धुरी आक्रमक

माणगाव प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील माणगावमध्ये बीएस एन एल च्या नेटवर्कचा लपंडाव सुरूच आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.bsnl च्या अधिकाऱ्यांना शिवसेच्या वतीने निवेदन देण्यात आले. रेंज पूर्ववत करा अन्यथा परत शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.

माणगाव मध्ये गेले काही दिवस परत BSNL च्या रेंजचं गायब होत आहे वारंवार तक्रार करून BSNL चे अधिकारी लक्ष देत नाही अशी ग्रामस्थांतून तक्रार होत होती. अधिकारी फोन उचलत नाहीत, अधिकारी वर्ग मस्तवाल झालेत माणगाव मधील बँक, हॉस्पिटल, ग्रामपंचायत, ई सेवा केंद्र व इतर सेवा हे BSNL च्या नेटवर्क वर अवलंबुन आहे असे असताना BSNL ची रेंज चं गायब होत असल्याने सगळ्यांचा वेळ वाया होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

या आधी याच संदर्भात एक अनोखे आंदोलन योगेश धुरी यांच्या माध्यमातून झाले होते त्याची दखल घेत BSNL ने 4ग सेवा चालू केली होती. पुन्हा रेंज गायब होत असल्याने मुलांचे ऑनलाईन अभ्यास करताना देखील अडचणी येत होते. BSNL सेवा पूर्ववत करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन रण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य योगेश धुरी अधिकाऱ्यांना दिला.

माणगाव मध्ये सतत BSNL ची रेंज नसल्याने
माणगाव पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, माणगाव उपसरपंच बापू बागवे, शिवसेना विभागप्रमुख एकनाथ धुरी, ग्रामपंचायत सदस्य काजल नाईक, शिवसेना शहरप्रमुख सचिन भिसे यांनी BSNL च्या अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page