सावंतवाडीत एका दिवसात दोन आत्महत्या

पोलीस घटनास्थळी दाखल,चौकशी सुरू

सावंतवाडी प्रतिनिधी
येथील बिरोडकर टेंब परिसरातील जंगलमय
भागात पुन्हा एका युवकाने आत्महत्या केली आहे. ही घटना सायंकाळी उघडकीस आली. दुपारी एक घटना घडलेली असताना आता पुन्हा हा प्रकार घडल्यामुळे अवघी सावंतवाडी सुन्न झाली आहे. गेल्या दोन दिवसात घडलेली ही तिसरी आत्महत्या आहे. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या बाबत अधिक चौकशी सुरू आहे. दुपारी घडलेल्या आत्महत्या प्रकरणाशी या प्रकरणाचा काही संबंध आहे का? याबाबत माहिती घेतली जात आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page