मालवणात १ मे रोजी प्रचिती सौदागर यांचा ‘नृत्यशंभो’ भरतनाट्यम् कार्यक्रम..

मालवण प्रतिनिधी
मालवण शहरात भरतनाट्यम् नृत्यांगना प्रचिती सौदागर यांचा ‘नृत्यशंभो’ भरतनाट्यम् कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ०१ मे २०२६ रोजी मालवण चिवला बीच येथील काळबादेवी एक्झाॅटिका येथे, संध्याकाळी ६ वाजता या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये ‘स्मिता उवाच’ या गुरु स्मिता महाजन लिखित आणि संगीतबद्ध केलेल्या रचनांचा समावेश असणार आहे. भरतनाट्यम् नृत्यांगना प्रचिती सौदागर या गुरु धनश्री आपटे व गुरु स्मिता महाजन यांच्या शिष्या आहेत.

या भरतनाट्यम् कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश असून कला रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page