जिल्हा बँकेच्या मजबूत आर्थिक स्थितीबाबत अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे केले कौतुक व अभिनंदन.!
सिंधूनगरी (प्रतिनिधी)
माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार मा.श्री. नारायणराव राणे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसे कर यांनी त्यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन स्वागत केले.बँकेचे संचालक गजानन गावडे,समीर सावंत,विद्याप्रसाद बांदेकर प्रकाश बोडस, जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत,मिलिंद कुलकर्णी,संदिप कुडतरकर, बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिवाकर देसाई,बँकेचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. खा.नारायण राणे यांनी बँकेने यावर्षी व्यवसायाचा ७००० कोटीचा टप्पा पार केल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर व संचालक मंडळाचे कौतुक करत अभिनंदन केले.तसेच ३१मार्च २०२६ रोजी बँकेच्या आर्थिक परिस्थतीची माहीती घेतली,बँक आर्थिक दृष्ट्या मजबूत असल्याचा निर्वाळा देत बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे अभिनंदन केले व समाधान व्यक्त केले.आयबीपीएस कंपनी मार्फत जिल्हा बँकेने राबविलेली भरती प्रक्रिया पारदर्शक रित्या पार पाडल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व संचालक यांचे खा.नारायण राणे यांनी यावेळी अभिनंदन केले. जिल्हा बँकेला आपले नेहमी सहकार्य राहील व आशीर्वाद असेल असे यावेळी खा.राणे यांनी स्पष्ट केले
