बांदा प्रतिनिधी
दिनांक १४ जून २०२६ रोजी जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधत आणि जिल्ह्यात निर्माण झालेला रक्ताचा भयंकर तुटवडा काही प्रमाणात भरून काढण्याच्या उद्देशाने कट्टा कॉर्नर बांदा येथील आनंदी मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील रक्ताची गरज लक्षात घेता रक्तदात्यांनी रक्तदानासारखे महापुण्यदान करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबीर श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा, सार्वजनिक नवरात्रौत्सव व कला क्रीडा मंडळ, कट्टा कॉर्नर बांदा, ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा आणि रक्तदान चळवळीत सातत्यपूर्ण काम करणारी ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा बांदा यांच्या सहकार्याने आयोजित केले आहे. रविवारी दि. १४ जून २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १.०० या वेळेत सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
इच्छुक रक्तदात्यांनी ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री दयानंद गवस (9821444170), स्वराज्य प्रतिष्ठानचे निलेश मोरजकर (9763717790), अक्षय मयेकर (9503871924), सार्वजनिक नवरात्रौत्सव व कला क्रीडा मंडळाचे नाना शिरोडकर (9767577774), ज्येष्ठ नागरिक विकास मंचचे सचिव गुरुनाथ नार्वेकर (9422379346) आणि समीर परब (9823830119) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने बांदा येथे येत्या रविवारी जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर
