पंचक्रोशी जामसंडे संघ लक्ष्मीनारायण चषक 2024 चा मानकरी..

कुडाळ प्रतिनिधी
श्री लक्ष्मीनारायण कबड्डी संघ वालावल आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा काल अतिशय थाटात संपन्न झाली. या स्पर्धेच उद्घाटन वालावल गावचे सरपंच श्री राजेश प्रभू तसेच गावातील जेष्ठ ग्रामस्थ व कबड्डी क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेत निमंत्रित अशा 12 संघांना आमंत्रित करण्यात आले होते. सहभागी सर्व संघांनी खिलाडू वृत्तीने खेळ करून आपला दर्जेदार खेळाने उपस्थित रसिकांची मने जिंकली व स्पर्धा यशस्वी केली. या स्पर्धेत सामनाधिकारी म्हणून श्री विशाल पारकर, श्री भुपेश राणे, श्री दीपक चव्हाण, श्री जनार्दन पाटील, श्री वसीम शेख, श्री विश्राम नाईक, श्री कृष्णा सावंत व श्री वैष्णव सावंत काम केले. स्पर्धेत श्री बादल चौधरी व श्री निखिल भर्तृ यांनी आपल्या बहारदार समालोचनाने रंगत आणली. स्पर्धेच्या दरम्यान हिंदू नववर्षाचे स्वागत अतिशय जल्लोषात साजरे करण्यात आले. स्पर्धेत माजी खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. श्री समीर सावंत, श्री संदीप सावंत, श्री अजय जाधव, श्री गणेश जाधव, श्री नरेश डोंगरे, श्री वसीम शेख, श्री विशाल पारकर, श्री भुपेश राणे, श्री रुपेश वाळके, श्री राजन घाडी व श्री अक्षय मयेकर या सर्व खेळाडुंचे आम्ही आभार व्यक्त करतो. स्पर्धेचा महाविजेता ठरला तो पंचक्रोशी जामसंडे संघ व उप विजयी संघ ठरला यंगस्टार कणकवली संघ. तृतीय क्रमांक श्री लक्ष्मी नारायण वालावल व चतुर्थ क्रमांकचा मानकरी पंचक्रोशी फोंडाघाट संघ यांना गौरविण्यात आले. शिस्तबद्ध संघ म्हणून शिवदैवत नेरूर संघाला चषक देऊन सन्मानीत करण्यात आले. स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू म्हणून मकरंद पाटकर व चढाई पटू म्हणून प्रथमेश पेडणेकर व पक्कड पटू म्हणून सिद्धेश भडसाळे यांना सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेला उपस्थित राहणारे सर्व मान्यवर तसेच सर्व कबड्डी प्रेमी, खेळाडू आणि पंच तसेच आम्हाला आर्थिक व वस्तू स्वरूपात देणगी देणाऱ्या सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page