सावंतवाडी प्रतिनिधी
नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे कोकण गोरत्न फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण होण्यास तसेच त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
यावेळी कोकण गोरत्न फाऊंडेशनचे अध्यक्ष शैलेश लाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शालेय जीवनात अभ्यासाला जितके महत्त्व आहे, तितकेच खेळालाही महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होण्याबरोबरच शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत नियमितपणे खेळांमध्येही सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे विद्यालयाच्या वतीने कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शालेय साहित्य मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या उपक्रमामुळे शाळेतील क्रीडा संस्कृतीला अधिक प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेवाळे सर व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर श्री. मनोज साळगावकर, संजय भाईप, मुख्याध्यापक शेवाळे सर, चव्हाण सर, सावंत मॅडम, आजगांवकर सर, पालव मॅडम उपस्थीत होते.
