सिंधुदुर्ग प्रतिनिधी
‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’ च्या वतीने दैनिक, साप्ताहिक, टिव्ही, रेडिओ या वेगवेगळ्या विभागातील पत्रकारांच्या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग काळ्या फिती लावून आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पत्रकारांच्या न्याय व हक्कांसाठी विविध घोषणा देण्यात आल्या. यानंतर पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले.
व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष परेश राऊत, कार्याध्यक्ष समीर महाडेश्वर, सह.सचिव संजय पिळणकर, खजिनदार शैलेश मयेकर, जिल्हा उपाध्यक्ष भूषण सावंत, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद धुरी,लवेश साळुंखे, विराज गोसावी, राजेंद्र दळवी, राजेश हेदळकर, चिन्मय घोगळे, वासुदेव गावडे, सुयोग पंडित, मिलिंद धुरी, मयूर ठाकूर, आनंद कांडरकर, आनंद धोंड, सिद्धेश सावंत, विवेक परब, विष्णू धावडे, प्रथमेश गवस आदी पत्रकार उपस्थित होते.