ग्राहक पंचायत संस्थेच्या दिनदर्शिकेचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते विमोचन..
वैभववाडी प्रतिनिधी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या दिनदर्शिका-२०२५ चे विमोचन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक सभा अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी परिषदेच्या सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीम. आरती देसाई, ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य सहसचिव, जिल्हाध्यक्ष व अशासकीय सदस्य प्रा.एस.एन. पाटील, जिल्हा…
