कुडाळ प्रतिनिधी
श्री भैरव देवाच्या पवित्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मंगलमय क्षण आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे साकार होत आहे. दि. ८, ९ व १० मे या पावन दिवसांत होणारा हा सोहळा केवळ धार्मिक विधी नसून, तो आपल्या गावाच्या श्रद्धेचा, एकोप्याचा आणि भक्तीभावाचा जिवंत उत्सव आहे.
या भव्य आणि दिव्य कार्यामागे उभे राहिलेले गडकरी बांधवांचे दातृत्व, प्रेम आणि निस्वार्थी योगदान खरोखरच वंदनीय आहे. मंदिराचा जीर्णोद्धार, नवीन गाभाऱ्याचे बांधकाम आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी, हे सर्व कार्य आपल्या सर्वांच्या उदार देणग्या आणि सहकार्यामुळे पूर्णत्वास आले आहे.
“देवासाठी दिलेले दान हे केवळ दान नसते,
तर ते भक्तीचे आणि पुण्याचे बीज असते.”
ही भावना मनात ठेवून प्रत्येक दात्याने या कार्यात हातभार लावला. त्यामुळेच आज हा सोहळा एवढ्या भव्यतेने साकार होत आहे.
या पवित्र कार्यासाठी देणगी देणारे सर्व गडकरी बांधव, गावकरी, हितचिंतक आणि भक्तगण यांचे मंदिर समितीच्या वतीने मनःपूर्वक आभार व ऋणनिर्देश व्यक्त करीत आहोत. आपल्या या दातृत्वामुळे श्री देव भैरव देवाचे मंदिर अधिक तेजस्वी आणि भक्तिमय झाले आहे.
ईश्वरचरणी अशी प्रार्थना की, श्री भैरव देव आपणां सर्वांवर कृपादृष्टी ठेवो, आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि मंगलमय आशीर्वाद प्रदान करो.आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच ‘श्रद्धा, एकता आणि भक्ती ‘यांचा हा दिव्य सोहळा शक्य झाला आहे. या सोहळ्याविषयी थोडक्यात, पण महत्त्वाचे –
कार्यक्रमाची रूपरेषा
दिनांक ८ मे २०२६ रोजी
महाप्रसाद झाल्यानंतर दु. ३.३० वा. ते संध्या. ६.३० वा.
ग्रामस्थांची व गडकरी बांधव यांची भजने.रात्री ८ ते ११ वा.
सांस्कृतिक कार्यक्रम -महाराष्ट्राची लोकधारा
दि. ९ मे रोजी
संध्या. ४ वा.- हळदीकुंकू समारंभ
संध्या.६ वा.ग्रामस्थांची व गडकरी बांधव यांची भजने.
रात्री ८वा.बाबी कलिंगण प्रस्तुत
कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे ट्रिकसीनयुक्त
दशावतारी नाटक.
सौजन्य – श्री. संजय लक्ष्मण शेडगे
दि. १० मे रोजी
महाप्रसाद झाल्यानंतर
दु. ४ वा. ते रात्री ९ वा.
भजनादी कार्यक्रम / महिलांच्या फुगड्या.
रात्री -१० वा. ऐतिहासिक नाटक- व्यंकोजी वाघ
यावर्षी प्रतिष्ठापना कार्यक्रमाची सांगता ऐतिहासिक नाटकाने होणार आहे.
महाप्रसाद झाल्यानंतर दु. ३.३० वा. ते संध्या. ६.३० वा.
ग्रामस्थांची व गडकरी बांधव यांची भजने.
रात्री ८ ते ११ वा.
सांस्कृतिक कार्यक्रम -महाराष्ट्राची लोकधारा
