शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन!
कुडाळ (प्रतिनिधी)
कुडाळ तालुक्यातील प्रधान मंत्री आवास योजना लाभार्थी यांनी घरे बांधून पुर्ण केली अशा लाभार्थीना अनुदान त्वरित वितरित करा अशा प्रकारची मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने मा आमदार वैभव नाईक यांच्या सुचनेनुसार नुकतीच करण्यात आली!
पक्षाच्या वतीने आज कुडाळ गटविकास अधिकारी श्री प्रफुल्ल वालावलकर यांना जिल्हा परिषद सदस्य श्री गंगाराम सडवेलकर यांच्या नेतृत्वाखाली मा आमदार वैभव नाईक यांच्या सुचनेनुसार निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे, नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघ शिवसेना उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, आंबडपाल उपसरपंच श्री धिरेंद्र चव्हाण, पंचायत समिती अधिकारी श्री डोईफोडे
व लाभार्थी उपस्थित होते
यावेळी श्री सडवेलकर यांनी सांगितले कि जि प व पंचायत समिती निवडणुकांमुळे लाभार्थी यांना अनुदान प्राप्त होण्यास विलंब झाला असेल असे गृहीत धरु परंतु काही लाभार्थी यांची घरे पुर्ण झाली व प्रस्ताव करताना परीपुर्ण कागदपत्रे सादर झाल्यावरच योजनेचा लाभ मिळाला आहे परंतु काही गावामध्ये निवडणुकांचा राग लाभार्थी यांच्यावर काढुन काही किरकोळ तक्रारी करुन अनुदान थांबवण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत म्हणूनच आच काही लाभार्थी यांना सोबत घेऊन गटविकास अधिकारी श्री प्रफुल्ल वालावलकर यांना निवेदन देऊन चर्चा केली असे जिल्हा परिषद सदस्य श्री सडवे यांनी सांगितले
यावेळी श्री वालावलकर म्हणाले ज्या लाभार्थ्यांची घरकुले पुर्ण झाली आहेत अशांच्या लाभार्थी यांना अनुदान लवकरच प्राप्त केले जाईल असे आश्वासन श्री वालावलकर यांनी सांगुन काही तक्रारी प्राप्त झाल्या अशांची खातरजमा करून काही त्रुटी असतील तर त्या दुर करुन अनुदान दीले जाईल याची ग्वाही श्री वालावलकर यांनी सांगितले
