जिल्ह्यात सिलेंडचा तुटवडा; सामान्य नागरिक “गॅसवर”

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांची खंत

कणकवली प्रतिनिधी
सध्या जिल्ह्यात निर्माण झालेला सिलेंडरचा तुटवडा व गॅस वितरणासाठी बदललेले नियम यामुळे सर्वसामान्य गॅस ग्राहकांना होणाऱ्या मनस्तापाबद्दल कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. सिलेंडरच्या तुटवड्यामुळे सामान्य नागरिक गॅस वर गेल्याची खंत व्यक्त करुन अगोदर ग्राहकांना वर्षाला १५ सिलेंडरचा पुरवठा करण्यात येत होता. पण नव्या नियमांमुळे ९ सिलेंडरही मिळणे मुश्किल बनल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात श्री. पेडणेकर यांनी म्हटले आहे की, सामान्य नागरिक आज गॅस वेळेवर मिळत नसल्याने हैराण झालेला असून बुकिंग करून सुध्दा सिलिंडर घरपोच कधी मिळेल याची शाश्वती नाही. घरपोच मिळण्याचे पैसे देऊन सुध्दा गॅस कार्यालयात तासनतास लाइन मध्ये ऊभे राहून सिलिंडर वाहनासाठी जादा पैसे खर्च करून घरी आणावा लागतोय. आधीच सामान्य नागरिक महागाईने हैराण झालेला आहे.

अगोदर प्रत्येक गॅसधारकांना वर्षात घरपोच मिळत होते. आज नव्या नियमानुसार २५
दिवसानंतर नविन बुकिंग करता येते, पण हिशोबने टॅग नंबर येईपर्यंत ३० दिवस होतात, त्यानंतर आठवड्याने गाडी घरपोच आली तर ठीक, नाहीतर चलो गॅस एजन्सी. या हिशोबाने सामान्य नागरिकांना वर्षाला ९ सिलिंडर पण मिळणे अशक्य आहे.

खेडेगावातील नागरिकांना ४५ दिवसानंतर नवीन बुकिंग म्हणजे खेडेगावातील लोक जेवण करत नाहीत का? एकतर जंगलतोड लागू आहे, मग त्यांनी जगायच नाही का? आजही काळ्या बाजारात घरगुती सिलिंडर २२०० रूपये आणि व्यावसायिक सिलिंडर ३२०० रूपये मध्ये अगदी बिनधास्तपणे विकला जातोय, हे सिलिंडर पाहिजे तेवढे मिळतात, मग सिलिंडर तुटवडा कसा म्हणता येईल?

आज सामान्य कामगार वर्ग वडापाव नाष्टा करायला गेला तर तो ही १० रुपये वरुन २० रूपये झाला, मच्छी जेवण १५० रूपये वरून २५० रुपयावर गेलेले आहे, याचे कारण हॉटेल मालकच उघडपणे सांगतात, काय करणार ३२०० देऊन सिलिंडर खरेदी करतो, या सर्वांचा परिणाम नागरिक, सामान्य कामगार वर्ग यामुळे
तरी संबंधित प्रशासकीय अधिकारी वर्गाने वेळीच लक्ष द्यावे, आणि सामान्य कामगार नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page