सिद्धेश परब यांची उपजिल्हाप्रमुख पदी निवडीनंतर पहिलीच कामगिरी गाजली ..

वेंगुर्ला तालुक्यातील रेडी जि.प.मतदार संघात तीन शाखांचे एकाच दिवशी उद्घाटन

शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाल्यानंतर श्री सिद्धेश विजय परब यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवत वेंगुर्ला तालुक्यातील रेडी जिल्हा परिषद मतदार संघातील रेडी, शिरोडा आणि आरवली या तीनही गावात शाखाप्रमुखांची निवड करून शिवसेना शाखांचे उद्घाटन यशस्वीरित्या पार पाडले.

जिल्हाप्रमुख श्री सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी जिल्हा समन्वयक श्री सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख श्री बाळा दळवी, उपसभापती श्री सचिन देसाई, युवा सेना जिल्हाप्रमुख श्री हर्षद डेरे, पंचायत समिती सदस्य सौ योगिता परब, माजी सभापती श्री सुनील मोरजकर, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे,यांच्यासह सरपंच लतिका रेडकर, उपसरपंच चंदन हाडकी, ग्रामपंचायत सदस्य अनिश्का गोडकर, ग्र.पं.सदस्य पांडुरंग नाईक,ग्र.पं.सदस्य प्रथमेश बांदेकर,सोसायटी चेअरमन काशिनाथ नार्वेकर, माजी सरपंच शेखर कुडव, माजी उपसरपंच मयूर आरोलकर,मा ग्र.पं.सदस्य कौशिक परब, प्राची नाईक, माजी उपसरपंच रवी पेडणेकर, माजी ग्र.पं.सदस्य उत्तम चव्हाण, कृष्ण सावंत, महिला शाखा प्रमुख पूजा राऊत,दिलीप मठकर, आनंद गोडकर, हर्षा परब,शितल साळगावकर, गौरव बर्डे, सुनील सातजी, रेशमी पेडणेकर, बाळा कुडव, नील झाटये,व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळी 3:00 वा. रेडी गणपती मंदिरात दर्शन घेऊन, 3:30 वा. रेडी ग्रामपंचायत नजीक, 4:00 वा. शिरोडा हॉटेल डोना डवली (ताराई) येथे आणि 5:00 वा. आरवली वेतोबा मंदिर नजीक हॉटेल आरवलीश्वर जवळ अशा नियोजित वेळेत सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध पार पडले.

*सिद्धेश परब यांच्या नियोजनाचे कौतुक:* निवडीनंतर अवघ्या काही दिवसातच इतक्या मोठ्या मतदार संघात संघटन बांधणी करत शाखा सुरू करणे, वरिष्ठांना एकाच व्यासपीठावर आणणे आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे या कामाबद्दल वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सिद्धेश परब यांचे विशेष कौतुक केले आहे. त्यांच्या या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे वेंगुर्ला तालुक्यात शिवसेनेला नवी ऊर्जा मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page