सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय दहशतवाद,आमदार दिपक केसरकर मात्र धृतराष्ट्राच्या भुमिकेत

जिल्हा शल्य चिकित्सक तथा इतर डॉक्टरांचा राजीनामा;अधिकाऱ्यांना धमकावणे कीतपत योग्य;उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा आरोप…

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधीच डॉक्टरांची प्रकर्षाने कमतरता भासत असतांना जिल्हा शल्य चिकित्सक व काही डॉक्टर यांनी राजीनामा देण्याचे कारण राजकीय दहशतवाद असे बोलले जात आहे. कुडाळ येथील आरोग्य विभागाच्या जागेतील अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारणास्तव जिल्हा शल्य चिकित्सक व सोबत असणाऱ्या डॉक्टरांना दमदाटी तसेच शिवीगाळ यामुळेच त्यांनी राजीनामा दिला असावा. नियमानुसार शासकीय जागेतील अनधिकृत बांधकाम पाडणे हे योग्यच आहे परंतु राजकीय द्वेषाने अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करणे कितपत योग्य आहे.डॉक्टर यांच्या राजीनाम्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या पक्षाचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्तेच जबाबदार असतील तर मग याला दीपक केसरकर यांच्या भाषेत राजकीय दहशतवादच म्हणावा लागेल.असं असेल तर राजकीय दहशतवादावर आप स्वार्थासाठी आवाज उठवणारे आमदार दीपक केसरकर यावेळी धृतराष्ट्राच्या भूमिकेतून बाहेर येणार का असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page