साळगाव-माणगाव मार्गावरील एका पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

कुडाळ प्रतिनिधी
तालुक्यातील साळगाव-मळवाडी ते साळगाव-माणगाव मार्गावरील एका पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना समोर आली.

पुलाखाली मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच संबंधित पोलीस पाटलांनी विलंब न करता कुडाळ पोलिसांना याबाबत कळविले. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, घटनास्थळाचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू आहे.

दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच मृत्यूचे नेमके कारणही स्पष्ट झालेले नसून, या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे.

घटना समोर आल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत विविध चर्चा सुरू असल्या तरी अधिकृत माहिती पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

पोलिसांकडून घटनास्थळावरील परिस्थितीची पाहणी करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page