श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी सचिन धुरी तर उपाध्यक्ष पदी दत्ता कोरगावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी समिती सदस्य म्हणून आर्या घाडी , मनोहर धुरी, पराग पाडगावकर, शर्वाणी मेस्त्री, ईश्वरी सावंत, सुनील जाधव, प्रज्ञा घाडी, प्रणिता पारधी, नागेश सावंत, वंदना आरेकर, रेश्मा परब, समीक्षा साटम , विनयकुमार आडेलकर , नम्रता टिळवे , वर्षा भिसे, राजेश चाळके, विनया साटम, अनुष्का तेली, शिक्षक प्रतिनिधी प्रशांत आडेलकर, भरत केसरकर, रोहन मेस्त्री, संस्था संचालक प्रतिनिधी चंद्रशेखर जोशी, मेघश्याम पावसकर, मुख्याध्यापक तथा सचिव चंद्रकांत चव्हाण यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित पालक, संस्था, आणि प्रशालेच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. माणगाव हायस्कूल मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात सुमारे ७५० विद्यार्थी शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि शाळेच्या विकासासाठी सर्वोतोपरी यशस्वी प्रयत्न करण्याचे नवनियुक्त अध्यक्ष सचिन धुरी, उपाध्यक्ष दत्ता कोरगावकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले. सभेचे प्रास्ताविक चंद्रकांत चव्हाण तर आभार चंद्रशेखर जोशी यांनी मानले.
माणगाव हायस्कूलच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी सचिन धुरी तर उपाध्यक्ष पदी दत्ता कोरगावकर यांची निवड
