कणकवली तालुक्यातील तरंदळे माजी ग्रा.प.सदस्य पूजा जाधव सह असंख्य कार्यकर्ते भाजपात..
कणकवलीत उ.बा.ठा.सेनेला धक्का…..! कणकवली प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील तरंदळे गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्य पूजा जाधव सह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला.भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि कार्यकर्तृत्वावर प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला असल्याचे सदस्य पूजा जाधव यांनी सांगितले. या प्रवेशामुळे तरंदळे पंचक्रोशीत उबाठा सेनेला फार मोठा धक्का बसला…
