भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
वेंगुर्ला प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . यावेळी जिल्हा उपाध्यक्षा व नगरसेवीका अँड. सुषमा खानोलकर यांनी कुशल प्रशासक , पराक्रमी विरांगणा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करताना त्या आदर्श राजमाता व अष्टपैलु राज्यकर्ता असल्याचे सांगितले . तसेच अहिल्यादेवी शिवभक्त होत्या.शिवाचे अस्तित्व…
