वेंगुर्ला प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .
यावेळी जिल्हा उपाध्यक्षा व नगरसेवीका अँड. सुषमा खानोलकर यांनी कुशल प्रशासक , पराक्रमी विरांगणा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करताना त्या आदर्श राजमाता व अष्टपैलु राज्यकर्ता असल्याचे सांगितले . तसेच अहिल्यादेवी शिवभक्त होत्या.शिवाचे अस्तित्व सगळीकडे आहे , असे त्या मानत . मल्हारराव होळकर यांच्यासारखे अहिल्यादेवींना एक श्रेष्ठ गुरु , मार्गदर्शक मिळाल्याने राज्यकारभारात त्या निपुण झाल्या . या आधारा वरच अहिल्यादेवींनी माळव्या प्रांतावर सुराज्य केले . तब्बल २९ वर्षे माळवा प्रांतावर लोककल्याणकारी राज्य केले .अहिल्यादेवींनी रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या . त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली .त्यांच्या राज्यात कोणतीही विधवा दत्तकपुत्र होऊ शकत असे . अहिल्यादेवी होळकर या एक खरोखरच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सुक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या , अशा पध्दतीत त्यांना अभिवादन करण्यात आले .
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रम समीतीचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई ,मंडल अध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब , जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रितेश राऊळ , उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर , सचिन शेट्ये (नगर सेवक) ,चेतना रजपूत (चिटणीस) , काजल कुबल (नगर सेविका) , वृंदा गवंडळकर ( जि. उपाध्यक्ष. महिला मोर्चा) , गौरी माईणकर (नगरसेविका) , रिया वासुदेव केरकर (नगरसेविका) , सदानंद तुळशीदास गिरप (नगरसेवक) , आकांक्षा आनंद परब (नगरसेविका) , प्रणाली धनंजय खानोलकर (चिटणीस) , वसंत महादेव तांडेल ( ता. सरचिटणीस) , शीतल आंगचेकर ( नगरसेविका) इत्यादी उपस्थित होते .
भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
