कु.तेजल भालचंद्र कदम हिची मुंबई पोलीस दलात निवड
कुडाळ प्रतिनिधी
नानेली सारख्या छोट्या गावातील अतिशय गरीब कुटुंबातील कुमारी तेजल भालचंद्र कदम ही गेले दोन-तीन वर्षे पोलीस दलात भरतीसाठी प्रयत्न करत होती अखेर तिच्या जिद्द परिश्रम आणि चिकाटी च्या जोरावर तीची मुंबई पोलीस दलात निवड झाली
तसेच इतर युवक युवतीने तिचा आदर्श घेत आपणही अशा प्रकारचे प्रयत्न करून शासकीय सेवेत भरती व्हा . ज्या ठिकाणी तुम्हाला मदत लागेल त्या ठिकाणी मी आणि माझा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरें पक्ष तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असे योगेश धुरी यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.
तसेच तेजल भालचंद्र कदम तिची पोलीस दलात निवड झाल्याबद्दल शिवसेना युवा सेना माणगाव खोऱ्याच्या वतीने तिचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी या भागाचे विद्यमान पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, नानेली ग्रामपंचायत सदस्य तथा युवासेना शाखाप्रमुख विनय कदम, शिवसेना शाखा संघटक अनिल धुरी, उपशाखा प्रमुख हेमंत घाडी, ग्रामपंचायत सदस्य सौ. अनिता धुरी, सागर घाडी विकास धुरी, विश्वनाथ अणावकर विकास धुरी उपस्थित होते.
