संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणारे निष्ठावंत वैभव नाईक
कणकवली प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सत्तेसाठी राजकीय पक्षांच्या झालेल्या अभूतपूर्व फाटाफुटीत अनेक दिग्गज नेत्यांनी आपले मार्ग बदलले आणि सत्ताधारी पक्षाची वाट धरली. परंतु, या सर्वांना वैभव नाईक हे अपवाद ठरले. विधानसभा निवडणुकीत अगदी थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला तेव्हा शिवसैनिक आणि जनतेच्या डोळ्यात दुःख, मनात वेदना होत्या. धनशक्तीमुळे जरी वैभव नाईक यांचा पराभव झाला असला…
कुडाळ पंचायत समितीचे मासिक सभेत गटनेते माणगाव पंचायत समितीचे सदस्य योगेश धुरी आक्रमक
मतदार संघातील विविध समस्यांबाबत वाचला पाढा कुडाळ प्रतिनिधी आज पंचायत समितीची मासिक सभा पार पडली.आर्थिक वर्षातील शेवटची सभा होती.नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य पहिल्याच वेळी सदस्य उपस्थित होते माणगाव पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी विविध समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करत आक्रमक होत सभा गाजवली.मासिक सभेत अनेक विषय मांडण्यात आले माणगाव मधील आरोग्य विभागाचा आढावा घेत माणगाव…
पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली भात खरेदी संदर्भात बैठक..
सिंधुदुर्ग प्रतिनिधी खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये अन्न, नागरी पुरवठा व नागरी ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार BeAM पोर्टलवर शेतकरी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. या नोंदणीसाठी सादर करावयाचा ७/१२ उतारा ई-पिक पाहणीद्वारे अद्ययावत असणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची पिक पाहणी DCS प्रणालीत नोंद न झाल्याने त्यांच्या ७/१२ उताऱ्यावर पिकांची…
मेगा मेडिकल स्पेशालिटी शिबिरातून ९४७ रुग्णांना दिलासा
सुपर स्पेशालिस्ट सेवांचा दुर्गम सिंधुदुर्गमध्ये लाभ;९ शस्त्रक्रिया यशस्वी,दर ३ महिन्यांनी होणार मेगा मेडिकल स्पेशलिटी तपासणी शिबिर सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दर तीन महिन्यांनी आयोजित होणाऱ्या या शिबिराचा मुख्य उद्देश दुर्बल व वंचित घटकांतील रुग्णांना सर्व प्रकारच्या…
“सिंधुदुर्गच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान हाच खरा मार्ग”:जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत
भोसले नॉलेज सिटीमध्ये ‘क्वांटेक्झेरा २०२६’ चा भव्य शुभारंभ…. सावंतवाडी प्रतिनिधी भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आज राष्ट्रीय स्तरावरील ‘क्वांटेक्झेरा २०२६’ या तांत्रिक महाउत्सवाचे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात उद्घाटन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत…
गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नफ्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा
सागर कारिवडेकरच्या सावंतवाडीतील आलिशान बंगल्याचा आज पंचनामा,ठाणे क्राईम ब्रँचचे विशेष पथक आज सकाळी सावंतवाडीत दाखल. सावंतवाडी प्रतिनिधी शेअर ट्रेडिंग मार्केट घोटाळ्याच्या प्रकरणाने अखेर मोठे वळण घेतले असून करोडपती सागर कारिवडेकरच्या सावंतवाडीतील आलिशान बंगल्याचा आज पंचनामा करण्यासाठी ठाणे क्राईम ब्रँचचे विशेष पथक आज सकाळी सावंतवाडीत दाखल झाले असून या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गुंतवणूकदारांना…
सावंतवाडीचे नाव महाराष्ट्रात बदनाम एक चिंतेची व लाजिरवाणी बाब.!
आमदार दिपक केसरकर राजीनामा देणार का? जिल्हाध्यक्षा सौ.साक्षी वंजारी यांचा सवाल सावंतवाडी प्रतिनिधी नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात संदर्भात सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचे नाव आल्याने व फोटो प्रसिद्ध झाल्यामुळे सावंतवाडीचे नाव येणे एक चिंतेची व लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे आमच्या सावंतवाडीचे नाव महाराष्ट्रात बदनाम झाले आहे. त्यामुळे निष्पक्षपणे एसआयटीद्वारे चौकशी होईपर्यंत आपला राजीनामा स्वतः…
मा.आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मांडकुली शिवसेना शाखेच्या वतीने तिरंगी डबलबारी उत्साहात संपन्न
वैभव नाईक यांचा सत्कार करत केक कापून वाढदिवस केला साजरा कुडाळ प्रतिनिधी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मांडकुली शाखेच्या वतीने शनिवारी मांडकुली येथे तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता. या डबलबारी सामन्याला वैभव नाईक यांनी भेट दिली असता त्यांचा सत्कार करत केक…
माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
कुडाळ प्रतिनिधी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा गुरुवार दि. २६ मार्च रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिकांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मांडकुली शाखेच्या वतीने शनिवार दि.२१ मार्च रोजी सायं ७ वाजता…
पालकमंत्री नितेश राणे घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा
हॉटेल व व्यापारी संघटनांच्या समस्याही जाणून घेतल्या सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली BPCL, IOCL आणि HPCL या तीनही कंपन्यांच्या समन्वयकांची तसेच जिल्ह्यातील हॉटेल व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स बंद…
