ठळक घडामोडी

ओव्हरटेक करण्याच्या नादात एस टी बसची मोटारसायकलला धडक

एसटी बस च्या चाकाखाली गेली मोटरसायकल कुडाळ प्रतिनिधी कुडाळ ते बांव जाणाऱ्या एसटी बसच्या चालकांनी ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन मोटरसायकला धडक दिली. त्यामध्ये एक मोटरसायकल एस. टी. बसच्या मागील चाकाखाली गेली त्यामध्ये मोटरसायकल वरील महिलेला गंभीर दुखापत झाली तिच्यावर कुडाळ ग्रामीण येथे उपचार करण्यात आले. दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी जाऊन या अपघाताचा पंचनामा केला. कुडाळ वरून…

Read More

शिवापूर येथील गवा रेड्याच्या हल्ल्यातील जखमी विठोबा शिंदे वन विभागाकडून मदतीचा हात

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पाच लाखाचा धनादेश वितरित कुडाळ प्रतिनिधी शिवापूर ग्रामस्थांनीही केली १ लाख २५ हजार आर्थिक मदत. कुडाळ : तालुक्यातील शिवापूर गावात विठोबा भाऊ शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गवारेड्याने हल्ला केला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर कुडाळ -मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत वनविभागाकडून नुकसानभरपाई स्वरूपात शासकीय मदत…

Read More

इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर अवैध दारूसह साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

बांदा प्रतिनिधी इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर सोमवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत 51 हजार 840 रुपयांची दारू व पाच लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात अलिबाग येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, इन्सुली तपासणी नाक्यावर गोवा राज्यातून…

Read More

महाशिवरात्री रील स्पर्धेत साईश गावडे प्रथम तर यश जाधव व्दितीय,मालवणी मुलगा तृतिय

आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे दिनेश गावडे यांनी आयोजित केली होती स्पर्धा सावंतवाडी प्रतिनिधी आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी महाशिवरात्री निमित्त हिरण्यकेशी मंदिराची रील स्पर्धा आयोजित केली होती, या स्पर्धेत सावंतवाडी येथील व सध्या डि वाय पाटील मेडीकल कॉलेज चा प्रथम वर्षाला शिकणारा विद्यार्थी साईश गावडे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे,…

Read More

हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीच्या वतीने दोन कर्तबगार महीलांचा सन्मान

सौ.अर्चना बंगे आणि श्रीम रुपाली देसाई यांचा सन्मान!अहिल्याबाई होळकर त्रीशताब्दी जयती निमीत्त दरवर्षी पुरस्कार! कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल गावातील बचत गटाच्या माध्यमातून आणि सतत सामाजिक कार्यातुन अग्रेसर असणाऱ्या सौ अर्चना बंगे आणि घरगुती खाद्यपदार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यात विक्री करुन गावातील महीलांना रोजगार देणा-या श्रीम रुपाली ललित देसाई यांचा सन्मान आज हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच श्री…

Read More

कुडाळ नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आले ‘एआय’ प्रशिक्षण

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांसाठी ‘एआय’ चे प्रशिक्षण देण्यात आले शासकीय कामकाजामध्ये गतिमानता आणि सुलभता कशी या माध्यमातून आणता येईल याचे प्रशिक्षण एमकेसीएलचे समन्वयक प्रणय तेली यांनी दिले. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना एआय चे प्रशिक्षण देणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली कुडाळ नगरपंचायत ठरली आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये बदल होत आहे आणि हे बदल आपल्या जीवनात सुद्धा घडत आहेत….

Read More

राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत ‘एचपीसी-एआय’ कार्यशाळा संपन्न

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन सावंतवाडी प्रतिनिधी आधुनिक तंत्रज्ञानातील सर्वाधिक गतिशील आणि भविष्यातील गरजांवर आधारित ‘हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये उत्साहात संपन्न झाली. ही कार्यशाळा भोसले अभियांत्रिकी महाविद्यालय, सावंतवाडी आणि वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने, भारत सरकारच्या ‘राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन’ अंतर्गत आयोजित करण्यात…

Read More

माणगाव हायस्कूल संस्थेच्या त्रैवार्षिक निवडणूक

सगुण धुरी पॅनलचा ९ पैकी ७ जागांवर विजय कुडाळ प्रतिनिधी माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या विद्यालयाच्या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूकित विद्यमान अध्यक्ष आणि माजी बांधकाम सभापती असलेल्या सगुण धुरी यांच्या श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनलने विरोधी दोन्ही पॅनलना थेट लढतीत धुळ चारत नऊ पैकी सात जांगावर विजय…

Read More

यशवंतगड येथे माहिती फलकाचे अनावरण

दुर्ग मावळा प्रतिष्ठान व यशवंतगड शिवप्रेमी रेडी यांची संयुक्त मोहीम* वेंगुर्ला प्रतिनिधी रेडी येथील यशवंतगड येथे आज रविवार दिनांक १ जून २०२५ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व यशवंतगड शिवप्रेमी रेडी यांच्या संयुक्त विद्यमानाने यशवंतगडाच्या माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले. यशवंतगडावर येणाऱ्या दुर्गप्रेमींना गडाचा नकाशा, माहिती व इतिहास समजण्यास मदत व्हावी या उद्देशाने सदर फलक लावण्यात…

Read More

अमृत महाआवास अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा ठरला अव्वल;मिळविला राज्यात दुसरा क्रमांक तर राज्यातील सर्वोत्कृष्ट तालुक्यात देवगड तालुका ही दुसरा क्रमांकावर

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन..! कणकवली प्रतिनिधी ‘अमृत महाआवास अभियान’ अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर या योजनेत सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यशामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाचे मत्स्यव्यवसाय व…

Read More

You cannot copy content of this page