जिल्हास्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा २०२६

महादेवाचे केरवडे येथे रंगणार नृत्याचा जल्लोष.! कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील महादेवाचे केरवडे येथे श्री सिद्ध महादेव मंदिर यात्रेनिमित्त शिवतेज ग्रुपतर्फे जिल्हास्तरीय भव्य खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सोमवार, दि. १८ मे २०२६ रोजी रात्री ८ वाजता मंदिर परिसरात पार पडणार असून जिल्ह्यातील नृत्यप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे….

Read More

इंधन तुटवड्याच्या अफवांना बळी पडू नका;प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी पर्यटन हंगाम सुरू असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काही काळ इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याची स्थिती होती. मात्र जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. जिल्हा प्रशासनाने भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOCL) या कंपन्यांच्या विक्री…

Read More

मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड.

मुंबई प्रतिनिधी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे ‘लेडी सुपरकॉप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. प्रशासकीय आणि पोलीस दलातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा आता राज्यातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी होणार आहे. मीरा बोरवणकर या भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अत्यंत वरिष्ठ आणि अनुभवी अधिकारी आहेत. १९८१ च्या बॅचच्या अधिकारी असलेल्या…

Read More

वृषाली रेडकर – येळावीकर यांना ‘कोकण रत्न सन्मान २०२६’ प्रदान..

विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग संस्थेकडून.. सावंतवाडी प्रतिनिधी सोशल मीडियावर ‘कोकणची वृषाली’ म्हणून घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध कलावंत वृषाली सुधाकर रेडकर -येळावीकर यांना यावर्षीचा मानाचा ‘कोकण रत्न सन्मान २०२६’ देऊन गौरविण्यात आले. विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट, सिंधुदुर्ग या संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘कला आंगण महोत्सव २०२६’ मध्ये हा…

Read More

श्री देव राणे वस मंदिर वेर्लें सटवाडी येथे ४ मे रोजी वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा

सावंतवाडी प्रतिनिधी तालुक्यातील वेर्ले सटवाडी येथे सालाबाप्रमाणे वार्षिक श्री देव राणे वस मंदिर येथे श्री सत्यनारायण महापूजा सोमवार दिनांक ४ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे.तरीही या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा सिंधुदुर्ग जिल्हा बेरोजगार सहकारी संस्था फेडरेशनचे संचालक राजन उर्फ कुशाभाऊ राणे यांनी…

Read More

नारूर येथे श्री देवी महालक्ष्मीचा ‘शिखर कलशारोहण’ सोहळा.!

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.! कुडाळ (नारूर):+ श्री देवी महालक्ष्मी देवस्थान नारूर येथे रविवार, दि. ०३ मे २०२६ रोजी ‘शिखर कलशारोहण २०२६’ हा भव्य सोहळा अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न होणार आहे. या मंगलमय प्रसंगी दिवसभर विविध धार्मिक विधी, महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. दिवसभराचे धार्मिक कार्यक्रम कलशारोहण सोहळ्यानिमित्त सकाळी ६.३०…

Read More

श्री थोरला देव युवा मित्र मंडळ गोठोस येथे २ मे रोजी सत्यनारायण महापूजा

दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील श्री थोरला देव युवा मित्र गोठोस मांडेशेतवाडी मंडळाच्यावतीने श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे.उद्या २ मे रोजी हे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजल्यापासून तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता हरिपाठ, रात्री ८ वाजता श्री देवी भावई समई नृत्य गोठोस मांडेशेतवाडी यांचा कार्यक्रम, तर…

Read More

पिंगुंळी जिल्हा परिषद मतदारसंघात गंगाराम सडवेलकर यांच्या सारखा आदर्श जिल्हा परिषद सदस्य लाभला :अतुल बंगे

पिंगुंळी केंद्रातील शाळा व विद्यार्थ्यांना दरवर्षी स्वखर्चातुन शैक्षणिक उपक्रम कुडाळ (प्रतिनिधी) दरवर्षी विद्यार्थी, शाळा, शिक्षक यांच्यासाठी स्वखर्चातुन शैक्षणिक उपक्रम राबवुन जिल्हा परिषद सदस्य श्री गंगाराम सडवेलकर यांनी आदर्शवत असे काम करत असल्याने पिंगुंळी जिल्हा परिषद मतदारसंघात गंगाराम सडवेलकर यांच्या रुपाने आदर्श लोकप्रतिनिधी लाभला असे गौरवोद्गार शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी काढले, पिंगुंळी…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोप

कृती पंधरवड्याचा समारोप जलसंस्‍कृती रुजवणे ही काळाची गरज;जिल्‍हाधिकारी तृप्‍ती धोडमिसे* सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज बनली असून, जलसंपत्तीचे संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक असले तरी पाण्याचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करणे आवश्‍यक आहे. प्रत्येक थेंब जपून वापरणे हीच खरी जलसंस्‍कृती असून ही जलसंस्कृती रुजवणे…

Read More

वेताळ बांबर्डे गावच्या हातेरी नदीतील गाळ उपसा पूर्ण

ग्रामस्थांनी मानले “नाम फाऊंडेशन”, “टाटा मोटर्स” आणि प्रशासनाचे आभार कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावाला पावसाळ्यात हातेरी नदीला पूरस्थितीचा मोठा फटका बसतो. यामध्ये प्रामुख्याने मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या तेलीवाडी येथील राहती घरे आणि शेतीत पाणी घुसून मोठे नुकसान येथील रहिवाशांचे नुकसान होते. तसेच नदीलगत असलेल्या जमिनीची धूपही मोठ्या प्रमाणात होते. मागील अनेक वर्षे हा प्रश्न…

Read More

You cannot copy content of this page