व्हेल माशांच्या” उलटी तस्करी प्रकरणी चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

दोन वाहनांसह २.४६ कोटिंचा मुद्देमाल हस्तगत:आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई..

कुडाळ प्रतिनिधी
पणदूर तिठा येथे व्हेल माशाच्या उलटीसह (अंबरग्रीस) चौघांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईत २ किलो ३७३ ग्रॅम वजनाच्या व्हेल माशाच्या उलटीसह एकूण २ कोटी ४६ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी २ किलो ३७३ ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस जप्त केले असून त्याची किंमत २ कोटी ३७ लाख ३० हजार रुपये आहे.

अंबरग्रीससह वाहने असा एकूण २ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.या प्रकरणी चौघांविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूर तिठा येथे व्हेल माशाच्या उलटीसह (अंबरग्रीस) ४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी शनिवारी संध्याकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास केली. या कारवाईत २ कोटी ३७ लाख ३० हजार किंमतीच्या २ किलो ३७३ ग्रॅम वजनाच्या प्रतिबंधीत व्हेल माशाच्या उलटीसह (अंबरग्रीस) पदार्थ आणि या गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने असा एकूण २ कोटी ४६ लाख किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेवून कुडाळ पोलीस ठाणे येथे त्यांच्या विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८, ५१ प्रमाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा. कु. नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा. श्री. दिपक शेलार, परि. पोलीस उपअधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक सनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, HC विल्सन डिसोजा, आशीष जामदार, PC अमर कांडर यांच्या पथकाने केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page