पशुपैदास क्षेत्रातील कारभारावर ग्रामस्थांचा संताप;१५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा..!
कुडाळ : माणगाव खोऱ्यातील पशुपैदास केंद्र निळेली येथील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांचा आक्रमक भूमिका घेतली असून, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत दिपक जयराम काणेकर, मिलिंद रामा धुरी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात शासकीय जागेतील बेसुमार वृक्षतोड, स्थानिक शेतकऱ्यांना योग्य माहिती व प्रशिक्षण…
सावंतवाडी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
सावंतवाडी प्रतिनिधी येथील प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे (वय ५५, रा. कणकवली) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. प्रकृती अचानक अस्वस्थ झाल्यानंतर त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मुसळे यांनी महसूल विभागात प्रदीर्घ सेवा बजावली होती. आपल्या सेवाकाळात त्यांनी कणकवली, वैभववाडी,…
सिंधुदुर्गातील ३ लाख ६३ हजार वीज ग्राहकांच्या हक्कांसाठी एल्गार !
२४ तास अखंडित व दर्जेदार वीजपुरवठ्याची मागणी ; ८५ हजार ग्राहकांवर स्मार्ट मीटर लादल्याचा गंभीर आरोप सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ६३ हजार वीज ग्राहकांना २४ तास अखंडित, सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, तसेच ग्राहकांना त्यांच्या नागरिक हक्कांनुसार सेवा व नुकसानभरपाई मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने ओरोस येथील इच्छापूर्ती…
हॉटेल, खाद्य व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे:पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एफडीएच्या कारवाया नियमावलीनुसारच; व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक नागरिकांनासह पर्यटकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे आवश्यक सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, मिठाईगृह, बेकरी तसेच अन्य खाद्य व्यवसायिकांनी अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे…
हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सिंधुदुर्गात विविध उपक्रमांचे होणार आयोजन
९ ते १७ ऑगस्टदरम्यान अभियान; नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी, दि. ८ (जिमाका) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, यंदाचे अभियान ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ समर्पित…
जबर मारहाण प्रकरणी शिवडाव येथील श्रीकांत तेली निर्दोष
संशयीताच्या वतीने ॲड.उमेश यांचा युक्तिवाद कणकवली /प्रतिनिधी शिवडाव ओटोसवाडी येथील प्रकाश दत्ताराम साळसकर यांना वैयक्तिक वाकडीकीतून जबर मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी शिवडाव येथील श्रीकांत राजाराम तेली याची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शुभम लटुरिया यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. ३ जानेवारी २०२० रोजी फिर्यादी प्रकाश साळसकर हे वाडीतील मारूती सावंत…
पॉश’ची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यातील 672 कार्यालयांना नोटीस.!
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठीच्या ‘पॉश’ (POSH Act-2013) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील शासकीय व खासगी कार्यालयांची तपासणी मोहीम सुरू आहे. जून 2026 पासून आतापर्यंत राज्यातील 3 हजार 579 शासकीय व 3 हजार 296 खासगी, अशा एकूण 6 हजार 875 कार्यालयांची तपासणी करण्यात आली आहे. आवश्यक पूर्तता न केलेल्या 294 शासकीय व…
बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना दोडामार्ग-सावंतवाडीतील २५ गावे पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (ईएसए) मसुदा अधिसूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील एकूण २५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गावांमध्ये बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्समार्फत जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनी संशयास्पद वृक्षतोडीची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई…
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यकारी अधिकारी पदी अनिरुद्ध देसाई यांची नियुक्त्ती;रिझर्व बँकेची मान्यता
सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी सहकार व बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले कार्यक्षम अधिकारी अनिरुद्ध देसाई यांची पुनश्च नियुक्ती करण्यात आली आहे. रिझर्व बँकेने ३ ऑगस्ट २०२६ रोजीच्या आदेशान्वये या नियुक्त्तीस अधिकृत मान्यता दिली असून श्री. देसाई यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे विकास…
आरोग्य विभागाकडील कंत्राटी वाहन चालक व प्रयोगशाळा तंत्रद्य कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीबाबत जिल्हापरिषद प्रशासनाची भूमिका “संशयास्पद”?
ठेकेदारांना पाठीशी नेमकं कोण? याबाबत जि. प. कर्मचाऱ्यांमध्येच रंगली “खमंग” चर्चा..! जिल्हा परिषदेच्या असंवेदनशील कारभारामुळे कंत्राटी कर्मचारी अक्षरशः मेटाकुटीला…! प्रसाद गावडे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत 50 कंत्राटी वाहन चालक व 6 लॅब टेक्निशियन कर्मचाऱ्यांची ठेकेदाराकडून आर्थिक पिळवणूक होत असून सेवा पूरवठादार असलेली तांडेल ग्लोबल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड एजन्सी कर्मचाऱ्यांच्या टाळूवरील लोणी खात…
