हुमरमळा वालावल प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे पल्स पोलीओ डोसचा शुभारंभ..!

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते अतुल बंगे आणि पोलीस पाटील सुबोध सावंत यांच्या हस्ते झाला शुभारंभ! हुमरमळा (प्रतिनिधी) आज हुमरमळा गावातील प्राथमिक उपकेंद्र येथे पल्स पोलीओ डोसचा शुभारंभ श्री अतुल बंगे आणि सुबोध सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आला आज पल्स पोलीओ घेण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना घेऊन डोस घेण्यासाठी उपकेंद्र येथे गर्दी केली होती यावेळी…

Read More

सहकारातील कार्यकर्त्यांच्या अनुभवातून जिल्ह्यातील सहकार समृद्ध करण्याचा प्रयत्न करूया:मनीष दळवी

जिल्हा बँकेत सहकार सप्ताह शुभारंभ सोहळा संपन्न..! सिंधूनगरी (प्रतिनिधी) बहुउद्देशीय संस्थेमार्फत वेगवेगळ्या संस्थांना कमी खर्चात प्रशिक्षण उपलब्ध होईल त्यातून प्रशिक्षित कर्मचारी वर्ग वेगाने निर्माण होतील त्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी, सुविधा प्रशिक्षण केंद्र यासाठी जिल्हा बँक मदत करेल.सहकार मंडळ व बहुउद्देशीय संस्था एकत्रितपणे जिल्ह्यातील संस्थांना पुढे घेऊन जाण्यास मदत करतील.सहकार क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र…

Read More

३५ वर्षांची ज्ञानसेवा पूर्ण; प्रा. प्रमोद धुरी यांचा सेवानिवृत्तीपर भव्य सत्कार

“माणगाव हायस्कूलमधील एक स्मितहास्य व्यक्तिमत्त्व निवृत्त होत आहे”:राजू रांगणेकर कुडाळ:ज्ञानदानाचा अखंड यज्ञ, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत धडपड आणि शिस्त, संस्कार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा सातत्याने घेतलेला ध्यास… अशा आदर्श शिक्षकाची ओळख निर्माण करणारे श्री. वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, माणगाव येथील व्यावसायिक विभागाचे प्राध्यापक प्रमोद रवींद्र धुरी हे नियत वयोमानानुसार मंगळवार, दि. ३० जून…

Read More

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव

सीबीएसई बोर्डातील यश व शैक्षणिक योगदानाची दखल सावंतवाडी प्रतिनिधी सहोदय कॉम्प्लेक्स कोल्हापूरच्या वतीने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे येथे आयोजित ‘सीबीएसई टॉपर सत्कार सोहळा २०२६’ मध्ये यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. सीबीएसई दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल शाळेचा विद्यार्थी सहर्ष सतीश धुमाळे याचा गौरव करण्यात आला. तसेच शिक्षिका दीपिका…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ संपन्न

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी भारत देशाला पोलिओमुक्त दर्जा प्राप्त झाला असला, तरी ही स्थिती कायम राखण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार दि. २८ जून २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून करण्यात आला. यावेळी…

Read More

बाळकृष्ण राणे यांच्या “सुंदरवाडी मधाळ स्वप्नांचं गाव ” पुस्तकाचे थाटात प्रकाशन

सावंतवाडी: सावंतवाडी येथील ज्येष्ठ लेखक बाळकृष्ण राणे यांच्या सुंदरवाडी मधाळ स्वप्नांचं गाव या ललितलेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार दिनांक २७ जून रोजी सकाळी ११.०० वा. श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते थाटात पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत खेमसावंत भोसले राजेसाहेब आणि प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुधाकर ठाकूर, कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर होते….

Read More

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वतीने मळेवाड,शिरोडा,रेडी,येथील लहान व्यापाऱ्यांसाठी व्यावसायिक छत्र्यांचे वाटप

“पावसापासून संरक्षण, सेवाभावातून समर्पण” या ब्रीदवाक्याला साजेसा सेवाभाव प्रत्यक्ष कृतीतून जपत महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब यांनी आज मळेवाड तिठा, शिरोडा बाजारपेठ व रेडी गणपती मंदिर अशा तीन ठिकाणी लहान व्यापाऱ्यांसाठी व्यावसायिक छत्र्यांचे वाटप केले. पावसाच्या सरींमध्ये रोजीरोटी कमावणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या अडचणी ओळखून त्यांना दिलासा देण्याचा हा उपक्रम अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेला. पावसाळ्यात…

Read More

आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अवघ्या १२ तासांत शासनाकडून २०९.१० कोटीची मदत जाहीर

आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशनात मिळाला दिलासा आद्यादेश जारी कुडाळ प्रतिनिधी पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा परिणाम म्हणून अवघ्या १२ तासांच्या आत राज्य शासनाने कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०९ कोटी १० लाख ६ हजार रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या कोकणातील शेतकऱ्यांना…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते अमित कदम यांचा सत्कार..!

कणकवली प्रतिनिधी खासदार नारायण राणे यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे अमित कदम यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग क्षेत्रात भारताचा झेंडा अभिमानाने फडकवत Mr. Universe स्पर्धेत सिल्वर आणि ब्रॉन्झ पदक पटकावणारे कोकणी बॉडीबिल्डर अमित अनिल कदम याचा आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज ओम गणेश बंगल्यावर सत्कार करण्यात आला. देशासाठी आणि संपूर्ण जिल्हावासियांची मान अंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग…

Read More

अपशब्द वापरून शिवीगाळ करणाऱ्या प्रांतअधिऱ्यावर कारवाई करा

राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.. ओरोस प्रतिनिधी दैनंदिन शैक्षणिक कामकाज सांभाळून BLO च काम करणाऱ्या शिक्षक बांधवा शिक्षक समिती देवगड अध्यक्ष श्री. जयेंद्र चव्हाण यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली देवगड मान प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचा तीव्र निषेद करत आज राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तृप्ती धोडमिसे यांची…

Read More

You cannot copy content of this page