अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड
मंत्री नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर विभागाने आज पर्यंत केलेली कारवाई; *कारवाई साठी गस्ती नौका आणि ड्रोन देखरेख यंत्रणा केली सक्रिय *सागरी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नौकांवर कडक कारवाईचा बडगा *नियमभंग करणाऱ्या नौकांविरोधात कारवाई सुरूच राहणार; मत्स्य विभागाचा इशारा फोटो;;;; सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर कारवाईचा…
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी योगा सेंटर सुरू करण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून प्रयत्न करणार;भाजप नेते विशालजी परब
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ मंत्रातून योगाचा प्रसार आणि निरोगी समाजनिर्मितीचा संकल्प! अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ आणि फिटनेस योग फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक!, प्रशिक्षणार्थी योग शिक्षकांचा युवा नेते विशाल परबांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव! सावंतवाडी प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘फिट इंडिया’ मंत्रातून प्रेरणा घेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील १७ जिल्हा परिषद मतदारसंघांसह…
आंबा व काजू पिकांसाठी कृषी सल्ला जाहीर तुडतुडे, करपा रोग व किडींच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांमध्ये नवीन पालवी फुटण्यास सुरुवात झाली असून, काही काजूच्या झाडांना मोहोरही दिसू लागला आहे. सध्या ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला यांच्यामार्फत दि. २४ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी आंबा व काजू पिकांचा…
अवैध खाणकाम, बेसुमार ब्लास्टिंगमुळे सिंधुदुर्गच्या भूजलसाठ्याला धोका?
खाणींची तातडीने तपासणी करण्याची मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या काळ्या दगडखाणींमधील तसेच मायनिंगच्या खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात कथित नियमबाह्य उत्खनन आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे भूगर्भातील जलसाठ्याला धोका निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष श्री. कुणाल किनळेकर यांनी केला आहे. खाणकामावर वेळीच नियंत्रण न आणल्यास…
सातबारा नोंदीसाठी ५ हजारांची लाच मागणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात
कुडाळ : प्रतिनिधी सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पिंगुळी येथील ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी जितेंद्र काळू खेताडे (वय २८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सिंधुदुर्ग पथकाने शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील रेल्वे ब्रिजजवळ सापळा रचून पकडले. लाचेची रक्कम स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती…
रूटी तलावातील मत्स्योत्पादन शून्यावर; मच्छीमारांना सर्वतोपरी मदत करणार!
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आमदार सुरेश धस यांच्यासमवेत केली रूटी तलावाची पाहणी बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सर्वात मोठ्या रूटी तलावाची मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेतला. दुष्काळामुळे रूटी जलाशय पूर्णतः कोरडा पडला असून, यंदा येथील मत्स्योत्पादन शून्य…
काजू-आंबा नुकसानभरपाईबाबत दोडामार्गातील शेतकऱ्यांना दिलासा द्या! DBT सीडिंग पूर्ण झालेल्यांची प्रलंबित रक्कम तातडीने जमा करा
पासबुकच्या झेरॉक्स प्रती घेतल्याने अनेक शेतकऱ्यांना बँक खात्यात थेट पैसे येण्याची अपेक्षा; DBT प्रक्रियेची माहिती नसल्याने काहींचे पैसे अडकले, आता सीडिंग पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची अपेक्षा दोडामार्ग प्रतिनिधी तालुक्यातील काजू आणि आंबा बागायतदारांना नुकसानभरपाईची रक्कम मिळावी, यासाठी शेतकऱ्यांकडून बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रती मागविण्यात आल्या होत्या. त्यामुळे आपल्या पासबुकवरील बँक खात्यातच नुकसानभरपाईची रक्कम जमा…
चराठा टेंबवाडी येथे २६ वर्षीय तरुणाचा गळफास घेत आत्महत्या;परिसरात शोककळा
सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यातील चराठा टेंबवाडी येथे एका २६ वर्षीय तरुणानं राहत्या घरातील खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. परेश उमेश तांबोस्कर असे मृत तरुणाचे नाव असून, गुरुवारी (ता. २२) सकाळी ही दुर्घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घरातील काही…
सुधाताई कामत शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात..!
आ.दिपक केसरकर;ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न राहिला सावंतवाडी प्रतिनिधी येथील कै.सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर जिल्हा परिषद प्राथमिक पीएम श्री शाळा सावंतवाडी नंबर २ नूतन इमारत भूमिपूजन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश…
आरोस येथील राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत लिंगेश्वर पावणादेवी भजन मंडळ प्रथम
आरोस प्रतिनिधी श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त आरोस येथील श्री देवी माऊली मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, कणकवली-जानवली यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी यांनी द्वितीय, तर स्वरब्रह्म प्रासादिक भजन मंडळ, देवगड यांनी तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक दत्तप्रसाद प्रासादिक भजन मंडळ, वर्दे…
